महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती दिसून येत आहे.
उबाठा – जिल्हा परिषद उमेदवार:
जिल्हा परिषदेसाठी उबाठा पक्षातून अभिषेक कदम (शिरगाव), गणेश गावकर (कुणकेश्वर), सुनील तेली (पुरळ), अंकिता सुहास वाडेकर (पडेल) आणि दिपाली मनोहर मेस्त्री (पोंभुर्ले) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
उबाठा – पंचायत समिती उमेदवार:
पंचायत समितीसाठी उबाठा पक्षातून सान्वी सुधाकर तिर्लोटकर (पुरळ), सुनील गणपत तिर्लोटकर (तिर्लोट), शशांक शरद तावडे (पडेल), सुहास वसंत वाडेकर (नाडण), सुलोचना सिताराम धुरी (बापर्डे), विष्णू बाबाजी घाडी (मणचे), व्यंकटेश जगन्नाथ नर (पोंभुर्ले), रोहिणी संतोष लाड (फणसगाव), मीरा मयुर सावंत (शिरगाव), प्रगती प्रदीप तेली (मुणगे), दीपक नारायण कदम (मुणगे) आणि गणेश गोपाळ वाळके (कुणकेश्वर) यांची नावे जाहीर केली आहेत.
मनसे – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार:
मनसेकडून रंजन सदानंद शिरगावकर (शिरगाव, जिल्हा परिषद) आणि सौ. निकिता नारायण दाभोळकर (कीजवडे, पंचायत समिती) यांची नावे जाहीर आहेत.
काँग्रेस – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार:
काँग्रेसकडून रेश्मा सावंत (बापर्डे आणि किंजवडे, जिल्हा परिषद) आणि मानसी मंगेश जाधव (तळवडे, पंचायत समिती) यांनी उमेदवारी नोंदवली आहे.
विशेष म्हणजे ज्या मतदारसंघांमध्ये मनसेच्या जागा आहेत, त्या ठिकाणी अन्य पक्षाने उमेदवारी दाखल केलेली नाही. तरी महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यादी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधत आहे, आणि पुढील काही दिवसांत युतीबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.












