खेड | प्रतिनिधी : शहरातील इमारतींची उंची लक्षात घेता फायर बंबावर असणारी शिडी ही केवळ ३५ फुटाची आहे. यामुळे नगर प्रशासनाला नवीन अत्याधुनिक बंबाची आवश्यकता भासत आहे. यापार्श्वभूमीवर नगर प्रशासनाने नव्या बंबाबाबतचा प्रस्ताव अग्निशमक सेवा संचालनालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार नवा अग्निशमक बंब नगर परिषदेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी मिटणार आहेत.