एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली मध्ये करियर संसदेचा शपथविधी सोहळा संपन्न

 

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत करिअर संसद 2025 26 या शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आज सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून परशुराम संतोष काळे, नियोजन मंत्री गोविंद महेश सावंत, कायदे व शिस्त पालन मंत्री उजैर अब्दुल्ला शेख, सामान्य प्रशासन मंत्री ऋतुजा संतोष परब, माहिती व प्रसारण मंत्री समृद्धी संतोष सावंत भोसले, उद्योजकता विकास दीप्ती विकास भोगण, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री गिरीश महेश कोचरेकर, कौशल्य विकास मंत्री गौतमी सावळाराम गावडे, संसदीय कामकाज मंत्री अपर्णा शांभा भैरवकर, महिला व बालकल्याण मंत्री प्राची गंगाराम परब, सदस्य सौरभ अनंत राणे यांनी विधी पूर्वक शपथ घेऊन आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमासाठी मेकॅनिकल डिपार्टमेंट विभाग प्रमुख प्रो. सचिन वंजारी, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब ठोंबरे , कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉ. नितीन शिवशरण, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रो. अजित गोसावी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रो. दर्शन म्हापसेकर, आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग प्रमुख प्रो. सुयोग सावंत, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रोफेसर ओंकार साळवी व करियर कट्टा समन्वयक प्रो. एकनाथ मांजरेकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात करिअर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रधान करण्यात आली. प्राचार्य डॉ. डी एस बाडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या व कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करियर कट्टा या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी सावंत भोसले व प्राची गंगाराम परब यांनी केले.