पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला तात्काळ निधी
जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचे विशेष प्रयत्न
वैभववाडी l प्रतिनिधी : आचिर्णे कडूवाडी प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी ८ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच शाळा दुरुस्तीचे काम पुर्ण होईल अशी माहिती सरपंच वासुदेव रावराणे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी खासबाब म्हणून शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून शाळा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
आचिर्णे कडुवाडी शाळा नादुरुस्त असल्याने गेली दोन वर्ष मुले समाजमंदिरात बसत होती. शाळा दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर १५ जुलै रोजी कडुवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी पंचायत समितीत जाऊन गटविकास अधिकारी यांना शाळा दुरुस्तीबाबत जाब विचारला होता.
दरम्यान संचालक दिलीप रावराणे यांनी या प्रश्नाकडे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे लक्ष वेधले. पालकमंत्री यांनी शाळा दुरुस्तीसाठी तात्काळ खासबाब म्हणून ८ लाख इतका निधी मंजूर केला आहे. संबंधित अधिकारी यांनी शाळेची पहाणी केली.
यावेळी संचालक दिलीप रावराणे, सरपंच वासुदेव रावराणे, आदेश रावराणे, व कडुवाडी ग्रामस्थ संदिप कडु, शेखर कडु, भालचंद्र कडु, तातु कडु, प्रकाश कडु, प्रमोद कडु, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा कडु व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.













