ओटवणे (प्रतिनिधी ) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक मे 2025 ची M.A.Ed अंतिम परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. दोन वर्षाचा शिक्षणक्रम असणाऱ्या कठीण समजल्या जाणाऱ्या या पारीक्षेत देवगड अभ्यासकेद्रावर विलवडे शाळा नं. 2 चे उपक्रमशील शिक्षक सुरेश काळे यांनी 72.50% गुण घेत प्रथम श्रेणीत येत उज्वल यश संपादित केले.याच बरोबर शालेय व्यवस्थापन पदविका (DSM ) यातही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन दुहेरी यश प्राप्त केले आहे.अध्ययन करीत असतानाच आपल्या ज्ञानात अजून भर पडावी त्याचा फायदा अध्ययन करताना मुलांनाही व्हावा यासाठी या अभ्यासाचीही जोरदार तयारी करत महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र मुंबरकर, प्राध्यापक दत्तात्रय गुलदगड यांचे योग्य मार्गदर्शन घेत त्यांनी या परीक्षेत उज्वल यश मिळविले. त्यांच्या सुयशाबद्दल विलवडे सरपंच प्रकाश दळवी,माजी उपसभापती कृष्णा सावंत शा. व्य.समिती अध्यक्ष रश्मी सावंत ,उपाध्यक्षा विशाखा दळवी,सहशिक्षिका प्रमिला ठाकर,अंगणवाडी सेविका सायली दळवी, मनाली दळवी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामस्, बांदा केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, बांदा शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर,सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी सविता परब सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके महेंद्र चव्हाण,उदय सावळ,सुस्मिता मांगले,मंगेश मुद्रस,शांताराम असनकर, सावडाव केंद्रप्रमुख सदगुरु कुबल,सविता राऊत,शुभेच्छा सावंत,विनया शिरसाट, विजय गावडे,नारायण नाईक,अमोल पाटील,सुनिल खरवत,भारती देसाई,जे. डी. पाटील,प्रविण कुडतरकर,प्रतिभा सावंत,अमोल आपटे,दासू गावित,मनोहर परब,शारबिद्रे व मित्र परिवाराने अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.













