गावातील स्वच्छतेची केली पाहणी
तळवली l वार्ताहर ;स्वच्छ भारत ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण ग्रामीण 2025 केंद्रस्तरीय मूल्यमापन समितीने नुकतीच निगुंडळ ग्रामपंचायत येथे केंद्रस्तरीय मूल्यमापन समितीने भेट दिली.
या समितीचे प्रमुख केतन पटेल यांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, धार्मिक स्थळे व सार्वजनिक शौचालय व कुटुंब गृहभेटी देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छता बाबत सखोल तपासणी केली सदर तपासणी समितीचे पूर्व तयारीसाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सर्व वाडी प्रमुख व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर समितीच्या पूर्वतयारीसाठी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, पं. स गुहागरचे विस्तार अधिकारी शरद भांड यांनी मार्गदर्शन केले. तर ग्रामपंचायत अधिकारी साईनाथ बागुल, सुरेश गोरे, साक्षी गोरे, संजय गोरे, रमेश मोहिरे, भरत घेवडे, कल्याणी करंदेकर, प्रियांका जाधव ,दीपक वाघेरे, श्रीमती कल्पना सुपे, तसेच तालुका समन्वयक स्वच्छ भारत मिशनचे सर्वेश साळवी, वृषाली जावळकर,चिखली ग्रामपंचायत, तळवली ग्रामपंचायत , परचुरी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाची सहकार्य केले.













