एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग ॲडमिशन साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा असलेलं फॅसिलिटेशन सेंटर उपलब्ध

एस.एस.पी.एम. महाविद्यालयात अभियांत्रिकी इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 साठीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा सुरू होणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अचूक मार्गदर्शन तसेच शासनाचे मान्यताप्राप्त DTE फॅसिलिटेशन सेंटर व ऑप्शन फॉर्म भरण्याची विनामूल्य सेवा मिळणार आहे.

 

योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय होण्याची शक्यता असते, या गोष्टीचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी या मार्गदर्शन कक्षाची स्थापना केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष (पदवी) अभियांत्रिकी कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती व ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध केली आहे.

 

या महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी, कॉम्प्युटर शास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर शास्त्र अभियांत्रिकी शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध आहेत.

 

बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खासदार नारायण राणे यांनी १९९९ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीमध्ये होत आहेत. विद्यार्थी व पालकांना अचूक माहिती मिळावी व कोणत्याही विभागातून उत्तम करिअर करता यावे यासाठी उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सज्ज असणार आहे.

 

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्यास

अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रा. सचिन मेस्त्री (७५८८५०५२८५), प्रा. इम्रान पटेल (९७३०८०२०४६)

व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी प्रा. वैभव माईणकर (९०४९८१३८७०), प्रा. अजित गोसावी (९४२०८२२४१५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी केले आहे.