गुहागर l प्रतिनिधी :जानवळे ओझरवाडीतील नवीन साकवाला कार्यकारी बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.मागील काही दिवस हा साकव वादग्रस्त ठरला आहे. या साकवाबाबत मनसेनेच्या वतीने नुकतेच निवेदन दिले होते.हा साकव नक्की कोणासाठी?तसेच या साकवाकडे जाणाऱ्या रस्त्याची नोंद शासकीय दप्तरी नसताना हा साकव नेमका कसा बांधण्यात आला? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केला होता?याची दखल घेऊन ही पाहणी करण्यात आली.यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, सरपंच जान्हवी विखारे,उपसरपंच वैभवी जानवळकर,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कोंडविलकर,संदीप कोंडविलकर अन्य ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.











