सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा आणि विश्वस्त, राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांची सातवी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई आणि सहसंचालक अॅड. शामराव सावंत उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलचा शिक्षक वृंद, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या स्मृतींना वंदन केले.












