लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी ॲड.अभिजीत पणदूरकर यांची निवड

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : लायन्स क्लब सावंतवाडीच्या २०२५-२६ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ॲड. अभिजीत पणदूरकर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विजय चव्हाण सचिव म्हणून तर प्रकाश राऊळ खजिनदार म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. या नव्या पदाधिकाऱ्यांचा आणि संचालक मंडळाचा शपथविधी सोहळा उद्या, २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती मावळते अध्यक्ष अमेय पै यांनी दिली.

नवीन संचालक मंडळात संदेश परब (प्रथम उपाध्यक्ष), महेश पाटील (द्वितीय उपाध्यक्ष), जितेंद्र पंडित (तृतीय उपाध्यक्ष), योगेश टकेकर (सहसचिव), अनिता पाटील (सहखजिनदार), बाळासाहेब बोर्डेकर (ट्वेल ट्विस्टर) आणि रोहित नाडकर्णी (टेमर) यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, लायन्स क्लबच्या विविध समित्यांसाठीही सदस्यांची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ भारत समितीमध्ये नीलम नाईक, स्वाती पै आणि मेघना राऊळ यांचा समावेश आहे. लायन क्वेस्टसाठी अनुश्री पणदुरकर आणि सुजाता परब यांची निवड झाली आहे. गजानन नाईक पीआरओ म्हणून काम पाहतील, तर गंगाराम पै मेम्बरशिप चेअरमन असतील. प्रसाद राऊत जीएमटी चेअरमन आणि महेश कोरगावकर जीएसटी चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळतील. युथ प्रोग्रामसाठी प्रतीक चोडणकर, निखिल पाटील आणि रोहन परब यांची निवड झाली आहे. हेल्थ समितीमध्ये डॉ. गोविंद जाधव, श्लोका चोडणकर आणि स्वाती राऊत यांचा समावेश आहे. रविकांत सावंत आणि राजन कुबडे ऍक्टिव्हिटी चेअरमन असतील, तर दया परब आणि सुनील दळवी फंड रेझिंगची जबाबदारी सांभाळतील.

या सर्व संचालक मंडळाचा शपथविधी उपप्रांतपाल डॉ. किरण खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याला सर्व लायन्स परिवार आणि लायन्स प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष अमेय पै यांनी केले आहे.