वन विभागाने घेतले ताब्यात
दोडामार्ग; सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील अनेक भागात चोरटी लाकूड वाहतूक होत आहे वन विभागाच्या माहिती नुसार दुचाकी वरून खैर प्रजातीचे ओंडके नेणाऱ्या दोन युवकांवर कारवाई केली आहे. यामध्ये विशाल दीपक शेटकर रा. तुळस व ऋतुकेश राजन डिचोलकर रा. मातोंड, ता. वेंगुर्ला अशी त्यांची नावे असून उगाडे, फोंडीये येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कारवाई केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे
वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी व कर्मचारी उगाडे फोंडीये भागात पालतीवर होते. यावेळी शुक्रवारी सायंकाळी येथील वनक्षेत्रात पावसाचा फायदा घेऊन दोघेही संशयित खैरप्रजातीच्या झाडांचे लहान ओंके दुचाकीवरून पिशवीत भरून वाहतूक करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी वनरक्षक उमेश राणे यांनी तपासणी केले असता ओंडके आढळून आले. त्यामुळे दोघाही संशयीतांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक उमेश राणे, शैलेश कांबळे, अजित कोळेकर, विश्राम कुबल वाहन चालक व इतर वन कर्मचारी यांनी ही कारवाई केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.












