26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी :
शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील नदी किनारी जंगलमय भागात गावठी दारुसाठी लागणारे गुळ व नवसागर मिश्रीत रसायन व इतर साहित्य अशा एकूण 26 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालावर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी 7.15 वा.सुमारास कारवाई केली.
संदेश गणपत जाधव (53,रा.मिरजोळे,बौध्दवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल उमेश पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा मिरजोळे पाटीलवाडी येथील नदी किनारी जंगलमय भागात बेकायदेशिरपणे हातभट्टीची दारु बनवण्यासाठी गावठी दारु बनवण्यासाठी लागणारे 200 लिटर गुळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन व इतर हातभट्टीचे साहित्य बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.










