लांजा तालुका भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन 

लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाजा तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे संपूर्ण राज्यभरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही शुभेच्छांचे बॅनर, वृत्तपत्रात जाहिरात न देता सेवेपयोगी उपक्रम राबविण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाने राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना दिले होते. त्या अनुषंगाने लांजा तालुका भाजपाच्या वतीने लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी सर्व रक्तदात्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा सचिव शिल्पा मराठे, लांजा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, हेमंत शेट्ये, माजी नगरसेवक संजय यादव, शेखर सावंत, गुरुप्रसाद तेली, सुमंत वाघदरे, मंगेश लांजेकर, चंद्रकांत खामकर, भास्कर खामकर, चंद्रकांत भुवड यांचेसह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.