दापोली | प्रतिनिधी
कोळथरे (गोलांबडे वाडी), ता. दापोली येथील सुनिता शांताराम फिरसे (वय ६८) या चुलीजवळ बसलेल्या असताना त्यांच्या साडीच्या पदराला अचानक आग लागून त्या गंभीर भाजल्या. ही दुर्घटना २१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ६.१५ वाजता घडली.
या आगीत सुनिता फिरसे या ८० टक्के भाजल्या होत्या. शेजाऱ्यांनी तत्काळ मदत करत त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची २२ जुलैच्या पहाटे ३.५३ वाजता प्राणज्योत मालवली.
या घटनेप्रकरणी २३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ४.४४ वाजता दाभोळ पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास दाभोळ पोलीस करत आहेत.











