बंद फ्लॅटमध्ये खिडकीतून प्रवेश करून अज्ञाताने ११ हजार ५०० रुपयांची केली चोरी

चिपळूण | प्रतिनिधी

पिंपळी खुर्द येथील शालीन रेसिडेन्सीमधील एका बंद फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने सुमारे ११ हजार ५०० रुपये रोख चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी काशीफा चांद शिकलगार (वय २७, रा. पिंपळी खुर्द, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. घर कुलूपबंद असताना चोरट्याने किचनच्या खिडकीतून घरात प्रवेश केला व बेडरूममधील पर्समधून रोख रक्कम चोरून नेली.

तक्रारीनंतर २३ जुलै रोजी मध्यरात्री १२.४४ वाजता अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.