गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात राजापूरच्या संकल्प गुरवची निवड

पाचल (वार्ताहर): गोवा येथे दि. ६ ते ७ आॅगस्ट रोजी १४ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघात राजापूरच्या संकल्प गुरव याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संकल्प गुरव याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राजापूर संघाच्यावतीने खेळताना संकल्प गुरव याने दमदार कामगिरी करून संघाला तृतीय क्रमांक प्राप्त करून दिला होता. त्याच्या नेत्रदीपक अशा कामगिरीची दखल घेत त्याची राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. संकल्प गुरव याला रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रमुख डॉ. योगिता खाडे आणि राज्यस्तरीय प्रमुख तायक्वांदो प्रशिक्षक युवराज विलास मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. यांनी देखील त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.