वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे रहिवासी, आंबा बागायतदार, जैतीर देवस्थानचे मानकरी सुभाष यशवंत परब (७६) यांचे आज रविवार २७ जुलै रोजी दुपारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, २ विवाहित मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांचे ते वडील होत. तसेच जि. प. माजी सदस्या योगिता परब यांचे ते सासरे होत. कै. सुभाष परब हे वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व तुळस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते.











