राजापूर अर्बन बँकेबाबत पसरविल्या जात असलेल्या कोणत्याही अफवा वा अप्रचारावर विश्वास ठेऊ नका

संचालक जयंत अभ्यंकर व सर्व संचालक मंडळाचे आवाहन

राजापूर (प्रतिनिधी): एकशे चार वर्षांची उज्वल आणि यशस्वी अशी वाटचाल करणारी बँक अशी राजापूर अर्बन बँकेची ओळख आहे. सवैसामान्यांची जिव्हाळयाची बँक अशी बिरूदावली घेऊन काम करणाऱ्या या बँकेच्या यशात वेळोवेळी साथसोबत करणारे आपल्यासारखे सभासद, ठेवीदार व असंख्य ग्राहक यांच्यामुळेच बँकेची दिवसेंदिवस भरभराट होत आहे. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेबाबत पसरविल्या जात असलेल्या कोणत्याही अफवा वा अप्रचारावर विश्वास न ठेवता आजपर्यंत जशी समर्थपणे साथ दिलात तशीच यावेळीही द्या असे आवाहन बँकेचे संचालक जयंत अभ्यंकर व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

आजपर्यंत आपल्या सर्वांचे हित या बँकेच्या माध्यमातून जपण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न केलेला आहे व यापुढेही करणार आहोत. राजापूर अर्बन बँकेचा सन २०२४-२५ चा वार्षिक अहवाल लवकरच प्रसिध्द होईल, स्टॅट्युटरी ऑडीटरने बँकेची असणारी ३१ मार्च २०२५ चा स्वीकारून काही गोष्टी प्रशासनाला निर्देशित केल्या आहेत. संभाव्य धोके नाहीसे करण्यासाठी कार्यपध्दती व मार्गदर्शनही त्यांनी केले आहे.

मात्र राजापुर शहर आणि परिसरात बँकेबाबत वस्तूस्थिती न जाणता बँकेबाबत अनेक पातळीवर वेगवेगळया अफवा पसरविण्याचा उद्‌देशाने कारस्थान केले गेलं आहे. बँकेचा निव्वळ नफा सुमारे १ कोटी पेक्षा अधिक झालेला असून बँकेचे इतर सर्व व्यवहार सुरु आहेत. बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. लेखापरिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार या चालु आर्थिक वर्षात खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणीही सुरु झालेली आहे. परंतू बँकेबाबत बँकेचे विपर्यास्त वर्णन जनमानसात सभासद, ठेवीदार यांच्यापर्यंत केलं जातय. बँकेचे ठेवीदार त्यामुळे संभ्रमित अवस्थेत आहेत. बँकेच्या सर्व सभासद, ठेवीदारांनी कृपया या भूलथापांना बळी न पडता आपला बँकेवर असणारा आजपर्यंतचा दृढ विश्वास कायम ठेवावा. आजवर बँकेला अनेक प्रसंगाना सामोरं जाव लागलं आहे. त्या वेळी बँकेच्या सर्व सभासदांनी, ठेवीदारांनी समर्थपणे साथ दिली आहे. तशीच साथ यावेळीही द्यावी असे आवाहन अभ्यंकर व संचालक मंडळाने केले आहे.

राजापूर अर्बन बँकेच्या स्थैर्याला धक्का पोहोचविण्याचा काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत आहे. सामान्य ठेवीदारांत त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे बँकेचे सर्व ग्राहक, सभासद, ठेवीदार हे सुज्ञ आहेत. को. ऑपरेटिव्ह बँकाना ठेवींचे सरंक्षण विमा कंपनी देते. आपल्या बँकेच्याही ठेवींना विमा संरक्षण आहे. या बँकेच्या सर्व ठेवीदारांना आम्ही सर्व संचालक विनंती करतो. या बँकेवर अबाधीत असणारा विश्वास असाच कायम ठेवून आपण निश्चितच आंम्हाला भक्कम असे पाठबळ द्याल असे आवाहन करण्यात आले आहे.

————————————————————–