ओम नमः शिवाय गजराने गावखडीचा श्री देव रामेश्वर दुमदुमला

गावखडी/ वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर रामेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त ओम नमः शिवाय गजराने दुमदुमत आहे या श्रीदेव रामेश्वराला दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची अमाप गर्दी आहे.
कोकणातील जागृत देवस्थानांपैकी गावखडी येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे श्रावण महिन्यात वातावरण आल्हाददायक असते .श्रावणातल्या चारही सोमवारी व शनिवारी मोठ्या संख्येने भाविक ठिकठिकाणीहून रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान रामेश्वर मंदिरात स्वयंभू शिवपिंडीचे दर्शनासाठी रीघ लागलेली असते. प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक श्रावणी सोमवारी शनिवारी दररोज आरती ओम नमः शिवाय जप मंदिरात चालू आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले गावकरी येथील त्रिदेव रामेश्वर हे दक्षिण कोकणातील एक धार्मिक दर्शनीय तसेच जागृत देवस्थान आहे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरील हा कुलस्वामी असलेले बरेच लोक त्यांना या स्थानाबद्दल आकर्षण तर आहेच .परंतु कोणी नवागती या स्थानी सहजपणे आला तरी भारावून जातो. प्रत्येकाला भक्ती भाव जागृत व्हावा असे हे शिवस्थान आहे श्रावणात गावखडी येथील जागृत देवस्थानचे देव रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे .ओम नमः शिवाय जयघोषाने गावखडी येथील श्री देव रामेश्वर मंदिर भक्तिमय वातावरण अतिशय उत्साही दिसून येत आहे.
गावखडीतील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर नवसाला पावणारा असल्यानेच सर्व शिवभक्त आम्हाला सर्वांना सुखी ठेव असे साकडे भाविक घालत आहेत.