
मुंबके येथील आमीर काझी या तरुणाचा उपक्रम !
देवेंद्र जाधव | खेड : भारतीय राजघटनेच्या अमंलबजावणीला या वर्षी ७३ वर्ष पूर्ण झाली आहेत २०२५ मध्ये राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण होतील यानिमित्ताने खेड तालुक्यातील मुंबके गावचा व संवेदना फेलोशिप प्राप्त आमीर काझी या तरुणाने संवेदना फेलोशिप अंतर्गत मध्ये रेल्वे मुंबईच्या संबधीत अधिकाऱ्याकडे मुंबई लोकल ट्रेनच्या एका डब्ब्याचे रुपांतर संविधान रेल्वे डब्बा म्हणून करण्याचा प्रस्ताव मांडला होता हा प्रस्ताव रेल्वेने स्वीकारून सध्या लोकल ट्रेन मध्ये संविधान डब्याची निर्मिती करण्यात आली असून खेड मधील तरुण आमीर काझी या तरुणाच्या प्रयत्नांना यश आले आहे
संविधान डब्या मध्ये आशय पूर्ण पोस्टर्स आणि यासाठीच्या आर्थिक सहयोगा साठी तयारी दर्शवली हा प्रस्ताव मुंबई विभागाचे (एडी आर एम) अरमिंद सिंग यांनी मनापासून स्वीकारला आणि २६ जानेवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे अधिकारी आणि पुकार संस्थेचा सामाजीक कार्यकर्ता अनिता देशमुख यांच्या हस्ते संविधान रेल्वे डब्याचे यशस्वीरीत्या उद्घाटन करण्यात आले
संविधान रेल्वे डब्यामध्ये संविधान सभा संविधानाची निर्मिती संविधानीक मुल्ये मुलभूत हक्क कर्तव्ये याबाबतच्या माहितीचे पोस्टर लावण्यात आले आहेत पोस्टरची रचना जनता आंदोलनाने केली आहे या पोस्टर मध्ये चित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मुल्ये सोप्या पद्धतीने नागरिकांना समजतील,उमजतील अशी रचना केली आहे यातून त्यांना आपली राज्यघटना जाणून घेणे सोपे होईल यासाठी आमीर काझी यांना कुर्ला कारशेड व वरिष्ठ डीईई रामेंद्र राय आणि संवेदना फेलोशिप टीम यांचे विशेष सहकार्य लाभले
मुंबई सेन्ट्रल लाईनवरील लोकल ट्रेन क्रमांक ५२६२ B मध्ये लेडीज कोजच्या पुढील व इंजिनपासून दुसरा डब्बा हा संविधान रेल डब्बा हा डब्बा २६ जानेवारी २०२३ पासून सर्वां साठी खुलाकरण्यात आला आहे संविधान साक्षरता वाढविण्याच्या महत्व पूर्ण कामासाठी आमीर काझी अनिता देशमुख आणि सबंधित रेल्वे अधिकारी यांनी घेतलेला हा पुढाकार अभिनंदनिय आहे तर संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त आणखी एका संविधान डब्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आले
याबाबत आमीर काझी यांनी ‘प्रहार’ शी बोलताना सांगितले कि सन २०१८ मध्ये ‘संविधान प्रचारक या चळवळीशी’ मी जोडला गेलो आणि माझा अभ्यास सुरु झाला तेव्हा माझ्या लक्षात आल कि संविधान कळत नकळत आपल्या जीवनाशी प्रत्येक क्षणी जोडलं गेल आहे संविधान आपण स्वाभिमानाने जगू शकतो, शिक्षण पूर्ण करू शकतो, हवं ते मिळवू शकतो संविधानान आपल्याला अनेक अधिकार दिले असून संविधाना मुळे आपल्या अधिकार संरक्षण आहे तसेच संविधान प्रचारक च्या माध्यमातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण किती गरजेच आहे हे लक्षात आल्याने त्याने यावर काम करण्यात सुरुवात केली पुढे दारूखाना येथील वस्त्यां मधील मुलांना त्यान मोफत शिकवायला सुरुवात केली तर महाविद्यालया मध्ये संविधानावर आधारित चर्चासत्रे आयोजित करण मदरशा मध्ये धार्मिक शिक्षणाच्या जोडीलाच ‘दिनी तालीम और भारत का आईन’ (संविधान)पुस्तकात न राहता लोकांमध्ये लोकांमार्फत रुजायला हवं अशी त्यांची भावना आहे
मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा विविध धर्माचे लोक प्रवास करत असतात यात श्रीमंत असतात गरीब असतात स्त्रिया पुरुष असतात असे सर्व प्रकारचे लोक प्रवास करत असतात यामुळे आमीरच्या मनात आले कि भारतीय संविधान हे लोकल मध्ये सुद्धा असण गरजेच आहे त्यानुसार आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आमीर च्या या उपक्रमा बद्द्ल खेड तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे
फोटो संविधान रेल डब्यात माहिती देताना आमीर काझी तर दुसऱ्या छायाचित्रात संविधान रेल डबा












