लोकसंचालित साधन केंद्रच्या आंदोलनकर्त्या महिलांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा

ना. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री महोदयांची ग्वाही

रत्नागिरी :

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र रत्नागिरी अंतर्गत आंदोलन करणाऱ्या महिलांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्यांवर सकारात्मक संवाद साधला

जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.काळाची जाणीव ठेवत सौ. ढेकणे यांनी संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांच्याशी थेट संपर्क साधला

ना. राणे यांनी त्वरित प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणी पत्रव्यवहार व चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक भूमिका घेत हा राज्याचा प्रश्न असून तो कॅबिनेटमध्ये मांडून तोडगा काढला जाईल अशी ग्वाही दिली.

भारतीय जनता पार्टी आंदोलनकर्त्या महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे त्यांच्या मागण्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही आणि सरकार म्हणून आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो असे आश्वासन सौ. वर्षा ढेकणे यांनी दिले

या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच बंदर व मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल असेही सौ वर्षा ढेकणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, मध्य मंडल अध्यक्ष प्रतिक देसाई, बाबू सुर्वे, निलेश आखाडे, रामदास शेलटकर, अनुष्का शेलार उपस्थित होते