सावंतवाडी आयटीआय येथे कारगिल विजय दिवस साजरा

सावंतवाडी : 26 जुलै 2025 रोजी जयानंद मठकर शाशकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी या संस्थेत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य ठाकुर सर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते श्री. राजेश कापडणीस माजी सैनिक आणि आताचे शिल्पनिदेशक जोडारी यांनी कारगिल युद्ध तसेच स्वतःचा आर्मी मधला अनुभव व इतिहासात होऊन गेलेल्या राजांचा गौरवशाली इतिहास सांगितला. कापडणीस सर यांनी स्वतःचा अनुभव सांगताना अंगावर शहारे आले श्री. तांडेल सर शिल्पनिदेशक जोडारी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तसेच समारोप श्री मनोहर सर शिल्पनिदेशक कातारी यांनी केलेकार्यक्रमास गटनीदेशक सौ सुचिता नाईक , श्री संतोष तेली , श्री जेष्ट निर्देशक दाभोलकर सर सर्व कर्मचारी वृंद व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.