छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राजापूरात ग्राम महसुल अधिकारी यांना लॅपटॉप वाटप

राजापूर (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राजापूरात ग्राम महसुल अधिकारी यांना आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले. तर या अभियानांतर्गत तालुक्यातील विविध लाभार्थींना विविध प्रकारचे दाखले वितरीत करण्यात आले.
राजापूरात महसुल प्रशासनाचे वतीने शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये जिवंत सातबारा नोंदी, रेशनकार्ड विविध प्रकारचे दाखले लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत. तर गाव पातळीवर महसुल प्रशासनाचा कारभार अधिक गतीमान करताना ग्राम महसुल अधिकारी यांना लॅपटॉप देण्यात आले आहेत.
राजापूर तालुका पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपिठावर प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसिलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहा. गटविकास अधिकारी निलेश जगताप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, महसुल नायब तहसिलदार श्रीमती गुरव, निवडणुक नायब तहसिलदार श्रीमती शेळके, माजी जि. प. अध्यक्ष जगदिश राजापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व सजाच्या ग्राम महसुल अधिकाऱ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले.याप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यानी महसुल प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याशी निगडीत कामांचा लवकरात लवकर निपटारा करून जनतेला चांगली सेवा दयावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सर्व मंडळ अधिकारी, महसुल प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो 31 आरजेपी 1
राजापूरात ग्राम महसुल अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप करताना आमदार किरण सामंत याप्रसंगी डॉ.जॅस्मिन, विकास गंबरे, अशफाक हाजू व अन्य.
————————————————————–