चिपळूण (वार्ताहर) : केदारनाथ गणेश चित्रशाळा पाटेकर आर्ट गुढे फाटा रामपूर येथे १८ वर्षाची परंपरा सांभाळत १ ते ६ फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती चित्रशाळेत विविध प्रकारच्या आकार घेऊन लागल्या आहेत. या चित्रशाळेत लालबागचा राजा, दगडूशेठ, महाराजा, चिंतामणी, राम मंदिर, पेशवा, शिवरेकर, सावकार, बालगणेश, ब्राह्मण पोझ, खास आकर्षक अघोरीबाबा, नंदी शंकर, कोळी राजा, एकविरा, स्वामी समर्थ, माऊली, कॅमल, अमेरिकन जर्मन कोच, वेलिंग, टिटवाला, म्हैसूरी, श्रीकृष्ण, राधाकृष्ण, फर्निचर, बैलगाडी, जगन्नाथ रथ, खास गणेश मूर्तीचा धोतर, फेटा, डायमंड प्रकारचे ५०० गणेश मूर्ती श्री केदारनाथ गणेश चित्रशाळा पाटेकर आर्ट येथे तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सुरज पाटेकर, सुजित पाटेकर, प्रांजली चितळे, संदेश काताळकर, रुपेश गिमवकर, मयुरेश पाटेकर, बाबाशेठ पाटेकर, सुवर्णा पाटेकर रात्र न दिवस जागून कलाकार गणेश मूर्ती अत्यंत सुंदर, आकर्षक, उत्तम रंग संगतीत परिश्रम घेऊन आकार देत आहेत.
श्री केदारनाथ गणेश चित्रशाळा पाटेकर आर्ट गुढे फाटा रामपूर येथे रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी, चिपळूण तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नितीन उर्फ आबु ठसाळे, चिपळूण तालुका शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष डॉ. जगदीश पाटेकर, राष्ट्रवादीचे सागवेकर, गुहागर तालुका मनसे माजी अध्यक्ष बाबाशेठ पाटेकर यांनी भेट दिली. कलाकारांच्या उत्कृष्ट रंगसंगती आकर्षक गणेश मूर्तीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावर्षी गणेश मूर्ती ३० टक्के किमती वाढल्या आहेत. केदारनाथ गणेश चित्रशाळा पाटेकर आर्ट् सर्वजण अहोरात्र मेहनत घेत आहेत. गणेश मूर्तींना पुणे, चिपळूण, खेड, गुहागर तालुक्यातील अनेक गावातून नोंदणी केली आहे.
फोटो फाईल- सीपीएन३१-९












