तिलारी धरण परिसर स्वदेश दर्शन २. ० योजनेत समावेशची मागणी पूर्ण होणार!!

▪️तिलारीत आनंद उत्सव, खासदार नारायण राणे यांचे तिलारी परिसरासह भाजपा दोडामार्गच्या वतीने आभार

दोडामार्ग – सुहास देसाई
तिलारी धरण परिसरात आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होऊन विकास करावा यासाठी स्थानिक पातळीवर अनेकवेळा मागण्या होत होत्या अखेर स्वदेश दर्शन २. ० योजनेत समावेशची मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आणि सकारात्मक चर्चा तिलारी परिसरात सुरु झाली. आज भाजपा दोडामार्ग तालुका अध्यक्ष दिपक गवस, कोनाळचे माजी सरपंच पराशर सावंत यांनी माध्यमाशी संवाद साधत खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.

श्री. गवस पुढे म्हणाले की, तिलारी पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यास सम्पूर्ण दोडामार्ग तालुक्याचाच फायदा होईल. मोट्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच स्थानिक उद्योगधंदे उभे राहतील. आमचे पक्षाचे नेते राणे यांच्यामुळे परत एकदा दोडामार्ग तालुका पर्यटन दृष्ठ्या विकसित होईल आणि येथील स्थानिक लोकांना न्याय मिळेल असेही श्री. गवस म्हणाले. तिलारी धरण परिसराला पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय कोंदण लाभणार आहे. खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत तिलारी धरण परिसराचा स्वदेश दर्शन २.० योजनेत समावेश करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन प्रतिमेला आणखी बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी खासदार राणे यांनी पाऊल उचलले आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी दुपारी १२.१५ वाजता भेट घेत कोकणच्या विविध प्रश्नांबरोबरच तिलारी धरण संदर्भात चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात तिलारी धरण परिसरातील जैव विवधतेकडे पंतप्रधांनांचे लक्ष वेधले. या परिसराचा केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. खासदार राणे यांनी दोडामार्ग तालुक्याचा विचार करून जी मागणी केलेली आहे त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.

युवकांनी देखील मानले आभार…..
गेल्याच बऱ्याच वर्षांपासून तिलारी धरण परिसराचा विकास व्हावा यासाठी तिलारी @ रोजगार एकता मंच मधील युवक युवती प्रयत्न करत होते. त्यांनी या संदर्भात काही वर्षांपूर्वी दोडामार्ग मधील दौऱ्यात खासदार राणे यांची भेट घेऊन त्यांना या परिसराचा विकास व्हावा या दृष्टीने एक निवेदनही दिले होते. तसेच या परिसराचा विकास झाल्यास येथील युवकांना याच भागात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे असेही सांगत त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र खासदार राणे यांनी या सर्व बाबींचा विचार करून तिलारी धरणाचा मुद्दा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडून येथील युवक युवतींना एक सुखद धक्का दिल्याने येथील युवक युवती देखील आनंदोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांनीही आमच्या पक्षाचे नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांचे विशेष आभार मानले आहे असेही तालुकाध्यक्ष दीपक गवस व युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष पराशर सावंत यांनी सांगितले आहे.