मालेगाव स्फोट प्रकरणाच्या निर्णयाचे बांद्यात स्वागत

बांदा l प्रतिनिधी :      २००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींना न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. या निकालामुळे हिंदू आतंकवाद हा अपप्रचारच होता, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हिंदू समाज कधीही आतंकवादाला पाठिंबा देत नाही, हे या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी श्रीराम चौक येथे स्थानिक हिंदू बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला.

 

यावेळी निलेश सावंत, शैलेश केसरकर, साई कल्याणकर, विराज परब, जयेश पटेकर, हेमंत दाभोलकर, सौरभ आगलावे, भैय्या केसरकर, साईराज पावस्कर, प्रवीण नार्वेकर, अमित कळंगुटकर, नितीन मावळणकर, नाडकर्णी सर, मंगेश पाटील (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जिल्हाध्यक्ष), मनोज वराडकर, अक्षय बांदेकर, राजाराम घोडगे, सर्वेश गोवेकर, तुषार देसाई यांसह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला. भगवे ध्वज हातात घेऊन नागरिकांनी एकमेकांना मिठाई वाटली. फटाक्यांच्या आतषबाजीत परिसर दणाणून निघाला.

 

यावेळी बोलताना निलेश सावंत यांनी सांगितले की, हा निकाल हिंदू समाजासाठी नवा विश्वास निर्माण करणारा आहे. खोट्या आरोपांनी हिंदू धर्माला बदनाम करण्याचा जो प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू होता, तो न्यायालयाच्या निर्णयामुळे फोल ठरला आहे. हिंदू समाज नेहमी राष्ट्रहितासाठी उभा राहत आला आहे व यापुढेही उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.