जगातील सर्वोत्तम सेवाभावी संघटना म्हणून ओळखल्या जाणार्या लायन्स क्लब्स इंटरनॅशनल या संघटनेच्या भारतातील डिस्ट्रिक्ट 3234 डी 1 या प्रांतातील रिजन मधील झोन चेअरमन पदी एमजेएफ ला.जगदीश वाघुळदे यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे
लायन्स क्लब चिपळूण २०२४/२५ चे अध्यक्ष एमजेएफ ला.जगदीश वाघुळदे यांचे लायनिझम कार्य उत्तम आहे. तसेच त्यांनी कॅन्सर बाबत चिपळूण मधील रॅली व मुंबईतील नामवंत कॅन्सर तज्ञ बोलावून मार्गदर्शन व तपासणी मोफत केली त्यामुळे त्याना प्रातांतुन सन्मानित करण्यात आले . लायन्स क्लब मधील सभासद वाढ केल्यामुळे सन्मान देवुन त्याना गौरविण्यात आले .म्हणुनच २०२५/२६ साठी झोन चेअरमन पदाची जबाबदारी त्याना देण्यात आली.या झोन मध्ये लायन्स क्लब रत्नागिरी,लायन्स क्लब हातखंबा.लायन्स क्लब चिपळूण व लायन्स क्लब ॲाफ न्यू रत्नागिरी या क्लब ची जबाबदारी देण्यात आली आहे.
27 जुलै रोजी खेड येथिल हॉटेल चंदी हवेली या अलिशान हॉटेल मध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये प्रांतातील सर्व लायन्स सदस्यांच्या उपस्थितीमध्ये माजी इंटरनॅशनल डायरेक्टर ला.नरेंद्रजी भंडारी यांच्या शुभहस्ते एमजेएफ ला.जगदीश वाघुळदे यांना झोन चेअरमन पदाची शपथ देण्यात आली.
तळागाळातील सर्व सामान्य जनतेच्या विविध गरजा लायन्स संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्द आहें. प्रामाणिकपणाने मी त्या पूर्ण करेन असा विश्वास नूतन झोन चेअरमन एमजेएफ ला.जगदीश वाघुळदे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.












