हातिवलेत रविवारी अनादि सिध्द शक्ती-तुरा समाज शाहीर संघ राजापूरचा वर्धापन सोहळा

राजापूर (वार्ताहर): अनादि सिध्द शक्ती-तुरा समाज शाहीर संघ राजापूर (रजि.) व सलग्न शाखा मुंबई या मंडळाच्या वर्धापन दिनानिमित रविवार दि. ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० ते सायं. ६.०० पर्यंत या वेळेत श्री देव दत्तमंदिर हातिवले येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त सागरीत मांड व ब्रिद पुजा, नवीन सभासद नोंदणी, प्रमाणपत्र नुतनीकरण, शाहिरी वंशावळी नोंदणी, जमा-खर्च अहवाल सादर करणे तसेच संघामार्फत चहा-पान, भोजन अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
तरी सर्व विश्वस्त मंडळ आजी-माजी पदाधिकारी, चिठ्ठी मालक, गुरुवर्य, कविवर्य, वस्ताद, शासकिय मानधन लाभधारक शाहिर, आजीव, क्रियाशील, सामान्य सभासद, रसिक व हितचिंतक यांनी सकाळी ९.०० वा. पासून श्री देव दत्तमंदिर हातिवले येथे उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शाहिर चंद्रकांत वालम कार्यवाह शाहिर संतोष हातणकर, कोषाध्यक्ष कृष्णा नागरेकर यांसह विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.