लांजा येथील नेत्र चिकित्सा अधिकारी सुहास देसाई यांना पत्नीशोक

लांजा( प्रतिनिधी) लांजा पंचायत समिती शिक्षण विभागातील वरिष्ठ क्लार्क शिल्पा सुहास देसाई यांचे शनिवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसययी त्या ४८ वर्षांच्या होत्या.
लांजा तालुक्यातील खावडी गावचे सुपुत्र आणि नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुहास देसाई यांच्या शिल्पा देसाई या पत्नी होत. लांजा येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ ऑप्टिकल्सचे मालक वसंत देसाई यांच्या शिल्पा देसाई या स्नुशा (सुन) होत. सौ शिल्पा देसाई या लांजा पंचायत समिती शिक्षण विभागात वरिष्ठ क्लार्क या पदावर कार्यरत होत्या. अत्यंत मनमिळावू मृदू आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या शिल्पा देसाई यांचे शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते होते.
शिल्पा देसाई यांचे काल शनिवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने लांजा शहरासह खावडी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज रविवारी खावडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लांजा पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवर्ग, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिल्पा देसाई यांच्या पश्चात पती डॉ. सुहास देसाई तसेच एक मुलगा, एक मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.

फोटो ३ लांजा, शिल्पा देसाई.