आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी फेडला पंढरपूरच्या पांडुरंगाचा नवस

टप्पा वाढीसाठी केला होता नवस

गौरव पोंक्षे माखजन
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी अविरत प्रयत्न केले.प्रयत्नांना दैवी ताकद मिळावी यासाठी आषाढी एकदशी च्या दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठलाला नवस केला होता.
९ जुलै रोजी शासनाने महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देत असल्याचे मान्य केले.१८ जुलै ला पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना १ ऑगस्ट २०२५ पासून वाढीव २०% वेतन अनुदानाचा टप्पा देत असल्याचे जाहीर करत निवेदन सादर केले.
यासाठी अधिवेशन काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्का मोर्तब ही करण्यात आले.यासाठी लागणारे ९७० कोटी रुपयांची तरतूद देखील १७ जुलै च्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.
यानंतर अनुदान वितरणाचा आदेश व प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार दिलेल्या शब्दप्रमाणे पडण्यासाठी आ ज्ञानेश्र्वर म्हात्रेंसह अन्य शिक्षक,पदवीधर आमदारांनी विशेष प्रयत्न केले.मंत्री गिरीश महाजन,चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण,शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावर देवेन्द्र फडणवीस यांनी वाढीव टप्पा हा ऑगस्ट पेड इन सप्टेंबर असा १००% दिला जाईल.जो शब्द सरकारने अधिवेशन काळात दिला आहे.तो प्रत्यक्षात पूर्ण केला जाईल असे स्पष्ट सांगितले.
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांची टप्पा वाढीची मागणी मान्य होत असल्याने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रत्यक्ष पंढरपूर ला जाऊन विठ्ठल व रखुमाई चे दर्शन घेतले.अंशतः अनुदानित शिक्षकांसमवेत जाऊन नवस पूर्ण केला.पंढरपूर च्या राज्यपरिषद सदस्य व मंदिराच्या ट्रस्टी श्रीमती शकुंतला नडगिरी यांच्यावतीने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.दुर्मिळ कान्होपात्रा ह्या दुर्मिळ वृक्षाचे रोपण करून पूजन करण्याचे भाग्य आ. ज्ञानेश्वर म्हात्रे याना लाभले.
यावेळी सुनील जगताप,दौलत भावार्थे,शैलेश गोऱ्हे, अरुण घोडविंदे आदी उपस्थित होते.