रवींद्र राणे यांची भाजपाच्या ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

लांजा (प्रतिनिधी) : लांजा येथील भाजपाचे कार्यकर्ते
रवींद्र राणे यांची भाजपाच्या ओबीसी मोर्चा जिल्हा (दक्षिण) उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
गेली काही वर्षे भाजपा पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करणाऱ्या रवींद्र राणे यांच्यावर पक्षा कडून रत्नागिरी जिल्हा दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून लांजा तालुक्यासह जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करतानाच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाला अधिक मजबुती आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे
दरम्यान रवींद्र राणे यांची ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे. आपल्या पदाचा उपयोग प्रामाणिकपणे पक्ष संघटना वाढीसाठी करणार असल्याचे रवींद्र राणे यांनी सांगितले.