सिं .शि .प्र.मं .अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त “समतेचे निर्माता व प्रकाश स्तंभ “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन .

सिं .शि .प्र.मं .अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली

येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त “समतेचे निर्माता व प्रकाश स्तंभ “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

 

“उद् धरली कोटी कुळे।भीमा तुझ्या जन्मामुळे|” या उक्ती प्रमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने “समतेचे निर्माता व प्रकाश स्तंभ” या विषयावर व्या. आविष्कार कांबळे यांच्या व्याख्यानाचेआयोजन करण्यात आले

कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजच्या मुख्य प्रांगणात असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्राचार्य मा.श्री.डॉ.डी.एस.बाडकर सर तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून ईजी. आविष्कार कांबळे सर उपस्थित होते. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.या वेळी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी घेतलेले कष्ट, समाजाने केलेला अन्याय व समाजासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेले योगदान कसे महत्वाचे आहे हे यावेळी त्यांनी पटवून दिले.

आजच्या स्पर्धात्मक युगात माणूस म्हणून आपण आंबेडकर यांना कसे बघतो, त्यांनी केलेले कार्य आपल्या साठी कसे महत्त्वाचे आहे.सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आणि त्यांचे विचार आत्मसात करण्याचा सल्ला दिला.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी कु. परशुराम काळे यांनी

डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोडबील, चवदार तळ्याचा सत्याग्रह व लोकशाही या विषयावर आपले मत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभम खरात यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठीहा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे संस्थापक मा. खा. नारायणरावजी राणे, अध्यक्षा मा. सौ. निलम ताई राणे, उपाध्यक्ष मा. आ. निलेशजी राणे, सचिव मा. ना. नितेशजी राणे,मा.प्राचार्य डॉ.डी.एस.बाडकर सर यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.यावेळी एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.अरविंद कुडतरकर सर, डॉ.शुभांगी माने मॅडम, प्रा.तन्मय कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी कु. तुकाराम नाईक,कु साईश कोचरेकर, कु भार्गवी कवाटकर, कु जिगिशा म्हापसेकर तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.