89 बैलजोड्यांचा सहभाग
श्री सुकाई देवी देवस्थान तळवली यांचे आयोजन
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने पार पडलेल्या सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धेत भैरी चंडिका तळवलीने प्रथम क्रमांक पटकावला तर आई गावदेवी तुरळ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धा ही गावठी बैलजोडीसाठी आयोजित करण्यात आली होती. श्री सुकाईदेवी ग्रामदेवता मंदिर तळवली येथे पार पडलेल्या यास्पर्धेमध्ये एकूण 89 बैलजोड्यांचा सहभाग होता.
सदर स्पर्धेत श्री स्वामी समर्थ पेवे खरेखोंड तृतीय,आई वाघजाई घोणसरे चतुर्थ,केदारनाथ प्रसन्न सावर्डे पंचम,शृंगारतळीचा राजा सहावा,किरण कदम रामपूर सातवा,सांबा कांडकरी मार्लेश्वर,तळवली आठवा,भैरी चंडिका प्रसन्न कारूळ नववा,जयदेव धमनाक दहावा,आई सुकाई देवी प्रसन्न पिंपळी अकरावा,शृंगारतळीचा राजा शृंगारतळी बारावा,सप्तेश्वर चंडिका देवघर तेरावा,तसेच विशेष सुंदर जोडी म्हणून गणेश मित्र मंडळ देवखेरकी व सुयोग समगिस्कर निगुंडळ यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व मानाची ढाल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर गावातील दोन बैलजोडीस देखील विशेष बक्षीस म्हणून अभिषेक सांगळे प्रथम व अमित डाकवे द्वितीय यांना गौरविण्यात आले.स्पर्धेचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तळवली ग्रामदेवता कमिटी व ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.












