जिल्हास्तरीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत मंडणगडची नेत्रदीपक कामगिरी

मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमीतील खेळाडूंनी केली 15 पदकांची कमाई

मंडणगड : प्रतिनिधी, दि. 7 – नुकत्याच झालेल्या चिपळूण येथे पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा सन 2025 या स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमीतील खेळाडूनी 15 पदके मिळवून स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले.
रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शहानुर चिपळूण तालुका तायकंदो अकॅडमी यांच्या सहकार्याने पुष्कर स्वामी मंगल हॉल चिपळूण येथे 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा पार पडली. हि स्पर्धा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, संचालक संजय सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेत मंडणगड तायक्वांडो अकॅडमी संचलित तायक्वांडो सेंटर क्लब मंडणगडच्या खेळाडूंनी ७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये आराध्या पवार हिने सुवर्ण पदक, प्रांजल पाटील रोप्य, श्रीशा कदम हिने कास्य पदक पटकावले, मुलांच्या गटामध्ये जय मोरे याने सुवर्ण, स्वस्तिक पवार याने रोप्य, रियांश आयरे याने कांस्य पदक मिळवले. सब ज्युनिअर गट मुलींमध्ये आराध्या कोळंबेकर हिने सुवर्ण, अर्णव जाधव याने कास्य, प्रशिक मर्चंडे याने कास्य पदक पटकावले. कॅडेट गट मुलींमध्ये वेदिका वाळुंज हिने रोप्य, मुलांमध्ये वेदांत दुर्गवले याने कास्य पदक संपादित केले. सीनियर महिला गटात सृष्टी विश्वदास लोखंडे यांनी सुवर्ण, संस्कार साळवी यांनी कास्य पदक मिळवले. सीनियर तायक्वांदो पुमसे महिला गटात सौ. काजल विश्वदास लोखंडे यांनी सुवर्ण, सीनियर पुरुष गटात विश्वदास हरिश्चंद्र लोखंडे यांनी सुवर्ण ही पदके मिळवून यश संपादन केले.
या खेळाडूंना मंडणगड तालुका तायकांडो अकॅडमी अध्यक्ष प्रशांत सुर्वे, प्रशिक्षक विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, ॲड. तेजकुमार लोखंडे, क्रीडाशिक्षक संजय अवेरे, गौतम माने व प्रणव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्ताने मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या वतीने आयोजित स्वागत समारंभात सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे तायक्वांदो सेंटर क्लबचे अध्यक्ष आदेश मर्चंडे, इंग्लिश मीडियम स्कूल चेअरमन डॉ. सुरेश लेंडे, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संतोष मांढरे, मुख्याध्यापक महेंद्र महाजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, नूतन विद्यामंदिर मंडणगडचे मुख्याध्यापक शांताराम पवार, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुष्मा बांगर, जि प शाळा गांधी चौक चे मुख्याध्यापक सुहास रांगले, तायक्वांदो अकॅडमीच्या संचालिका सौ. दीपिका घोसाळकर, सेजल गोवळे, मानसी पालांडे, संचालक रवींद्र मिश्रा, जयराम कोटेरा, सुधीर महाडिक, पालक सौ. दिपाली पवार आदी मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
फोटो ओळी : रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंडो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू सोबत जिल्हा तायक्वॉंडो असो. उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, मंडणगड क्लबचे अध्यक्ष आदेश मर्चंडे, प्रशिक्षका काजल लोखंडे व अन्य