पंकज भाई शहा यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना मिळाले शालेय साहित्य
खेड (प्रतिनिधी) –
लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने आज दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शहा ऑटोमोबाईलचे मालक पंकज भाई शहा यांनी आपले अमूल्य सहकार्य दिले.
या उपक्रमांतर्गत खालील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले:
1. चाकाळे जिल्हा परिषद शाळा
2. आंबया ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद शाळा
3. आंबया सकपाळवाडी जिल्हा परिषद शाळा
या शाळांमधील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर, क्रेयॉन्स आदी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. विक्रांत पाटील यांनी पंकज भाई शहा यांचे विशेष आभार मानले. “अशा दानशूर व्यक्तींमुळेच लायन्स क्लबला समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास सदैव बळ मिळते,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमावेळी लायन्स क्लबचे खजिनदार माणिक लोहार, लायन सुमित चिकणे, शिक्षक वर्ग तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांमध्ये समाजहिताचे उपक्रम राबवत असतो. अशा कार्यातून सामाजिक भान आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र या उपक्रमात पाहायला मिळाले.










