
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे चंद्रकांत कावले बिनविरोध निवडून आले. या वेळी भाजपाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, दया पाटील, गटनेते शरद ठुकरुल, सर्व नगरसेवक-नगरसेविका, राजा वालकर, व्ही.सी. खडपकर, बापू जुवाटकर, वैभव करंगुटकर आणि सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत कावले हे जामसंडे क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाजसेवक असून, पक्षाने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहे.











