कुवळे येथे रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा

शिरगाव, (प्रतिनिधी)     देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत कुवळे-रेंबविली येथे रामेश्वर महिला ग्रामसंघाने पी आर आय – सी बी ओ कन्व्हर्जन्स प्रकल्प अंतर्गत रानभाजी महोत्सव आणि रानभाजी पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात भरवून घेतली.ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणे आणि आरोग्यदायी आहाराचा प्रसार करणे — हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.

या महोत्सवाला महिलांकडून उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सुभाष कदम यांनी गावातील महिलांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले.

या महोत्सवाला कुवळे सरपंच सुभाष कदम,उपसरपंच सुहास राणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष प्रभू देसाई, प्रणया मालनकर, रोहिणी लाड, पोलीस पाटील रोहित कदम, रामेश्वर महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा अक्षता लाड, सचिव साक्षी पाताडे, बी आर पी सुचिता परब, सी आर पी अमृता लाड, बचत गट लेखापाल लीना बागवे तसेच सर्व गटांचे सदस्य, बचत गट कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवात नऊ बचत गट सहभागी झाले. प्रत्येक गटाने पावसाळी हंगामातील पालेभाज्या, वेलभाज्या, फळभाज्या आणि मुळभाज्यांपासून बनवलेल्या पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पाककृती सादर केल्या होत्या.