फोंडाघाट/कुमार नाडकर्णी — मूळ शेरपे, सध्या फोंडाघाट येथील जुने जाणते दिवाणजी, स्व. यशवंत सखाराम कुलकर्णी (84 वर्षे ) वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री ११ वाजता, राहत्या घरी दुःखद निधन झाले. मिळुन- मिसळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते व्यापारी परिवारात सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुलगे,नातवंडे, जावई, सुना असा परिवार आहे. कणकवली येथील विमा सल्लागार प्रसाद आणि ओरस सिंधुदुर्ग बँकेतील ज्युनियर ऑफिसर पांडुरंग तथा नाना यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाबद्दल फोंडाघाट हवेलीनगर आणि परिसरात दुःख व्यक्त होत असुन,अंत्ययात्रेत फोंडाघाट परिसरासह कणकवली, खारेपाटण,शेरपे, वारगाव येथील मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि आप्तेष्ट उपस्थित होते. वैकुंठभूमीत त्यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.













