परम पूज्य पद्मनाभ शिष्य संप्रदाय तथा स्वामी सदानंद आरोग्य धाम यांच्या वतीने आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रीमत सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने परम पूज्य पद्मनाभ शिष्य संप्रदाय आणि स्वामी सदानंद आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत श्री क्षेत्र परंधाम मठ, गुळदुवे येथे होणार आहे.
या शिबिरात विविध व्याधींवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून, प्राथमिक औषधे देखील विनामूल्य दिली जाणार आहेत. या शिबिरात तपासल्या जाणाऱ्या प्रमुख व्याधींमध्ये जीर्ण त्वचा रोग (Psoriasis, Eczema), जीर्ण सांध्यांचे आजार, आमवात, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, मानसिक आजार (स्वमग्नता – Autism), केसांच्या समस्या, जीर्ण सर्दी, Frozen Shoulder, Cervical Spondylitis, वंध्यत्व व मासिक पाळीचे आजार (PCOD, Painful menses), डोळ्यांचे आजार, मुतखडा, पित्ताचे आजार, मूळव्याध, Prostate enlargement आणि Chronic Constipation यांचा समावेश आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी शंकर सावळ (८३२९१८८४१४), भाविका काळोजी (८८९८६१५७२९), आबा केदार (९४२०६५३२७१), आणि दिनानाथ काळोजी (९११२८४४४५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.











