कोलगाव नाका येथील अपघातात दुर्दैवी घटना
सावंतवाडी : सावंतवाडी येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेचार च्या सुमारास कोलगाव नाका येथे घडली आहे. सदर दुचाकीस्वार माजगाव येथील असल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.












