महायुती अभेद्य ठेवणारा आदर्श कार्यक्रम! 

भावा बहिणीचे नाते सुप्रियाताईंनी जोपासले.-आमदार निलेश राणे

सिंधुनगरी l प्रतिनिधी :यापूर्वी असे घडले नाही ते या कार्यक्रमातून दिसले. शिंदे शिवसेना व भाजप ही महायुती एकत्र आहे हे भाजपच्या महिला नेत्या सुप्रियाताई वालावलकर यांनी या कार्यक्रमातून दाखविले. भावा बहिणीचे नाते त्यांनी सांभाळले त्यापेक्षा आमची महायुती अभेद्य आहे हे या कार्यक्रमातून दिसले असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी ओरोस येतील कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे उपस्थित शिंदे शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला चांगलीच दाद दिली.

सिंधू नगरी येथील पत्रकार भवनांमध्ये भाजप नेत्या सुप्रियाताई वालावलकर यांच्या पुढाकाराने या मतदारसंघातील वाहनचालकांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सुप्रियाताई वालावलकर, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, सरपंच परशुराम परब, गौरव घाडीगावकर, प्रितेश परब, साक्षी कोचरेकर, नीता जुवेकर आधी उपस्थित होते.

शिंद