विज्ञान मेळाव्यात दक्षेश मांजरेकरचे यश!

मसुरे | झुंजार पेडणेकर :राष्ट्रीय विज्ञान मेळावा अंतर्गत महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय तळेबाजार येथे संपन्न झालेल्या देवगड तालुकास्तरीय

विज्ञान मेळाव्यात श्री भगवती हायस्कूल मुणगे चा विध्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने द्वितीय क्रमांक पटकवला. या मेळाव्यात quntam युग – संभाव्यता व आवाहने हा विषय देण्यात आला होता. पॉवर पॉईंट च्या माध्यमातून सादरीकरण तसेच तोंडी व लेखी परीक्षेमार्फत एकूण मूल्यांकना मध्ये दक्षेश ने द्वितीय स्थान पटकावले आहे. यासाठी प्रशाळेचे विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांनी मार्गदर्शन केले तर हरिदास महाले यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका मोनिका कुंज तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन करत जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.