फोंडाघाट कॉलेजात वृक्षसंरक्षण व रक्षाबंधन उपक्रम संपन्न

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त वृक्षसंरक्षणाचा उपक्रम पार पडला.

 

 

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरातील वृक्षास राखी बांधून वृक्षसंरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.

 

 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंधर नारे म्हणाले की, जगभरामध्ये वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हवामान, पर्जन्यमान यावर विपरीत परिणाम होत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी वृक्षतोड थांबवणे काळाची गरज आहे. आणि म्हणूनच रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, यापुढे वृक्षतोड न करता वृक्ष संरक्षण करण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील स्वयंसेवक, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते…