माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राखी बनवणे स्पर्धा

गौरव पोंक्षे l माखजन :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल,सरंद येथे राखी बनवणे स्पर्धा घेण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले व अन्य शिक्षक उपस्थित होते व मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत १ ते ४ थी गटात श्रुती शिगवण तर

५ते ७ वी गटात वैदवी जोगले व

८ ते १० या गटात स्वरा मेस्त्री हीच प्रथम क्रमांक आला.या स्पर्धेचे परिक्षण माखजन इंग्लिश स्कूल येथील ज्येष्ठ शिक्षक गणेश शिंदे,महादेव शिंदे यांनी केले.स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष किशोर साठे व अन्य संचालकांनी कौतुक केले आहे.