रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेत शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी *नारळी पौर्णिमा* व *रक्षाबंधन* सण उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक शिवाजी बोटके उपस्थित होते. शिवाजी बोटके यांनी नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकिनारी प्रदेशात राहणाऱ्या मच्छिमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनासह पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या सणाचे महत्त्व कोळी लोकांच्या मध्ये जास्त असून हा सण महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, असे सांगितले. तसेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार समुद्र देवतेची पूजा करतात. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. श्रावण पौर्णिमेला पूजाविधी केल्याने समुद्रदेव प्रसन्न होतो समुद्राचा सर्व संकटापासून मच्छीमारांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण नारळ पौर्णिमा म्हणून साजरी करतात असेही सांगितले. तसेच प्रशालेत रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या सहा अध्याय भावंडाच्या मनगटावर राख्या बांधून त्यांचे व रक्षण करण्याचे वचन घेतले. विद्यार्थ्यांनीही बहिणींचा गोडधोड व छोटे कानी भेटवस्तू देऊन प्रेमाचा हा पवित्र बंद दृढ केला.
त्याच पद्धतीने विद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत तर कर्मचाऱ्यांना राखी बांधून बंधूभावाचे नाते दृढ केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी बोटके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल सागवेकर यांनी मानले.











