वेंगुर्ले l दाजी नाईक :गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस पथकाने आणखी एक कारवाई केली आहे.
मूळ बेळगाव व सध्या हरमल गोवा येथे राहणारा सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्या कडून २६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी ७.७५ च्या सुमारास वेंगुर्ले पावर हाऊस जवळ करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.











