बांदा l प्रतिनिधी :दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावर उभ्या ओम्नीला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्टसमोरच घडली. अपघातानंतर क्रेटा चालक फरार झाला आहे. बांदा पोलीस दाखल झाले असून आत मध्ये असलेली दारू जप्त करण्याचे काम सुरू आहे.

सावंतवाडीच्या दिशेन दारू घेऊन जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ओम्नी कारला धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित दारू वाहतूक करणारा चालक जखमी झाल्याचे समजते. दरम्यान आपण अडचणीत येऊ नये म्हणून चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला.
अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील स्थानिकांनी गाडीच्या ठीकाणी धाव घेतली. मात्र गाडीत मोठ्या प्रमाणात दारू असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी गाडीतील दारू व गाडी जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.












