
कुडाळ:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी कुडाळ तालुक्यातील जयेश चिंचळकर यांची निवड करण्यात आली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन नेमणूक जाहीर केली आहे. जयेश चिंचळकर यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे ओरोस मंडल युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. भाजपाच्या पक्ष वाढीसाठी नेहमी तळमळ असलेला कार्यकर्ता म्हणून चिंचळकर ओळखले जातात. सामाजिक कार्यात देखील ते पुढे असतात. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणार आहे पक्ष संघटना वाढीसाठी युवांना एकत्र घेत आपण पक्ष हिताचे व समाज हिताचे काम करणार असल्याचे श्री चिंचळकर यांनी सांगितले. श्री चिंचळकर यांच्या निवडीवेळी ओरस मंडल अध्यक्ष भाई सावंत, जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, रुपेश कानडे, छोटू पारकर, हार्दिक शिगले, सुनील बांदेकर आदी उपस्थित होते.












