रीसॉर्ट कर्मचाऱ्याचा पोहता – पोहता कलोते धरणात बुडून मृत्यू
खोपोली/राज साळुंके
खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीमधील कॅप मॅक्सजवळ लाईफ अँड जॉय या रिसॉर्ट मधील कामगाराचा कलोते धरणात 12 ऑगस्ट च्या सकाळच्या सुमारास बुडून मृत्यू झाला असून अभय शिवाजी राऊत असे या मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव असून माजलगाव बीड जिल्ह्यातील आहे.
अभय शिवाजी राऊत हा 23 वर्षे तरुण खालापूरमधील लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमध्ये कामाला लागून चार दिवस झाले होते. हे हॉटेल कलोते धरणाच्या अगदी कडेला असल्याने अभय राऊत याने जीन्स आणि टी शर्ट घालून त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली असता काही अंतर तो पोहला खरा, मात्र दूरचे असल्याने त्याची दमछाख झाली आणि पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असता या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हेल्फ फाऊंडेशन खोपोली यांना पाचारण करून शोध मोहीम सुरु केली असता 4 तासाच्या अथक प्रयत्नातून अभय राऊत याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले असून या घटनेचे पुढील अधिक तपास खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस करीत आहेत.












