रत्नागिरी | प्रतिनिधी: राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे हे गुरुवार, दि. 14 ऑगस्ट रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी चिपळूण येथे त्यांचे आगमना होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता ना.राणे चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे ‘आमचा देवा भाऊ’ या अभियानांतर्गत राख्यांचे संकलन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सकाळी साडेनऊ वाजता ना. राणे हे मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता रत्नागिरी शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात ‘आमचा देवा भाऊ’ अभियानांतर्गत राख्यांचे संकलन होणार आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी सुमारे 12 वाजता मंत्री राणे सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील.











